
रोज सांगतोस.... माझ्याशिवाय जगू शकत नाहीस,
माझ्याशिवाय एक ही स्वप्न बघू शकत नाहीस.
रोज सांगतोस.... तुझ्या बरोबर वेळ कसा जातो कळत नाही,
कसा तुझ्या प्रेमात पडलो? ह्याचे उत्तर काही मिळत नाही.
रोज सांगतोस..... माझ्या डोळ्यांशीवाय तुला हल्ली काहीच दिसत नाही,
आणि तुझ्या बायकोच्या जागी माझ्या-एवढी पर्फेक्ट कुणीच बसत नाही.
रोज सांगतोस... आपल नात किती वेगळे, किती छान आहे,
माझ्या एका हसणया पुढे, सगळ्या गोष्टी किती लहान आहेत.
पण...
एक दिवस सहज सांगशील, "बंधन हे तोडून जा,
माझ्यावर असलेले सगळे हक्क, आजपासून सोडून जा..."
एक दिवस सहज सांगशील, " पण मैत्री आपण तोडायची नाही.
आणि माझी साथ तू कधीच सोडायची नाहीस....."
एक दिवस सहज, स्वत:हून , तुझ्या बायकोची भेट घडवशिल ,
डोळ्यातले पाणी आवरून धरीन मी , जेंहवा हात तिचा हातात धरशिल .
त्या दिवशी मात्र, फक्त मित्र -मैत्रिणी सारखे वागू,
तू माझ्या कडून घेतलेल्या... "त्या" वचनाला जागू.
त्या दिवशी जाताना "ती" म्हणेल, "तुमची खूप छान मैत्री आहे."
तुझ्याकडे बघत मी म्हणीन "हा तुझी खूप काळजी घेईल.... ह्याची मला खात्री आहे."
त्या दिवशी सुद्धा मी वेड्यासारखी मागे वळून पाहीन,
त्या दिवशी सुद्धा मी वेड्यासारखी मागे वळून पाहीन,
तुम्हा दोघांना पाठमोरे पहाताना... जे समजायचे ते समजून जाईन!!!
कविता चांगली आहे. ह्या पलीकडे अजून काही लिहिणे शक्य नाही
ReplyDeleteGud 1...keep writing...now it's ok to call u कि. क. --- किंचित कवि...ही हा हा
ReplyDeleteआम्हाला पाठमोरे पाहाताना तू जे समजायचे ते समजशील, पण तूला असे सोडण्याची माझी ही आही काही कारणे असतील, हे तू कधी समजशील...काही कारणाने सोडून दिले म्हणजे प्रेम कमी झाले असे नाही, हे तू कधी जाणशिल...
good du... superb
ReplyDelete@Mangirish Dada.. wah wah....
ReplyDeletepan kahihi karan asude... sodaycha kashala???
hi hi hi
ekdam khachchi!!!
ReplyDeleteFarch sunder!!!
Full senti......
ReplyDeletesundar lihilay
ReplyDelete