Tuesday, November 30, 2010

शादी चा लाडू

शादी चा लाडू खाण्याची माझी वेळ आता समीप आली आहे...

अती समीप आली आहे....



लग्नाचे योग वर "आसमान" मधे ठरवले जातात हे योग्यच असाव....
योग जुळून येतात.. अनपेक्षित पणे....
आणि काही कळायच्या आत....
तुमच्या डाव्या हाताच्या बोटावर एक सोनेरी नाव कोरले जाते..

नाही नाही म्हटलं तरी सगळ्या गोष्टी हळू हळू बदलू लागतात...
आजूबाजूची माणसं... त्यांचा तुमच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन....
तुमचे विचार... तुम्ही सुद्धा....

टेन्निस चा फॉर्हॅंड कसा मारायचा ते
ओटी कशी भरायची इथ पर्यंतचा प्रवास सुरू होतो....

रॅकेट बरोबर पकडण्याच्या पद्धती पेक्षा साडी नेसण्याच्या पद्धती शिकाव्या लागतात....
रिस्ट बॅंड ते मॅचिंग बांगड्या...
हेड स्टॅंड - शोल्डर स्टॅंड ते कुंकवाचे बोट कुठले आणि हळदीचे बोट कुठले?
रीबॉक रन्निंग शूज जाउन पैंजण येतात....
कब्बडी मधे क्रॉस कसा लावतात या पेक्षा रुखवतात कुठली नक्षी चांगली दिसेल.....
पल्सर वर बसूनच ती मेन स्टॅंड ला कशी लावायची या पेक्षा
भरलेला पापलेट करायच्या पद्धती शिकणे...

सिक्स पॉकेट कार्गो जाउन लाल-निळे-हिरवे पंजाबी ड्रेस आले....
"आमची दुर्गा म्हणजे अगदी साधी सरळ..."
हे जेंव्हा शब्द कानावर पडतात तेंव्हा मला ती दुर्गा आठवते जी...
मल्टिपलेक्स मधे बसून येणार्‍या जाणार्‍या मुलींना दहा पैकी "मार्क" देते...
(मुलींना मार्क माझ्या मित्रांसाठी... माझ्या साठी नाही...)

हे बदल खूप इंट्रेस्टिंग आहेत.... मजा येते....
कधी कधी खूप अवघड वाटत....
पण कधी ना कधी तरी स्वप्नांच्या जगाला अलविदा म्हणाव लागत....
हे ही एक वेगळ.. नवीन जग आहे....
हा प्रवास आहे... एका मुलीचा "चि." पासून "चि. सौ. का." पर्यंतचा....