Sunday, April 26, 2009

माझी आजी ...

ह्या विषयावर लहानपणी बहूतेक सगळ्यांनी एकदा तरी निबंध लिहिला असेल.

आजी म्हटले की मला आठवतो एक छान चापून चोपून घातलेला आंबाडा.
किती तरी वर्ष, किती तरी पिढ्या... तो आंबाडा तसाच आहे...
आणि आजीच वजन ही... आम्ही इकडे डायटिंग करतोय,
जिम करतोय, जॉगिंग करतोय.... पण काही फरक नाही....
आजीला आत्ता बघितल की वाटत.. तरुणपणी किती सुरेख दिसत असेल आजी...

"आजी" ची एक युनिव्हरसल डेफिनेशन आहे...
आई-बाबांकडून ओरडा खाल्यावर किंवा खायच्या आधी जाण्याची सेफेस्ट जागा म्हणजे "आजी"...

पण आजी म्हटले की आठवतो तो.... चपातिवरचा एक्सट्रा तूपाचा चमचा....

"मिले सूर मेरा तुम्हारा" तल्लीन होऊन ऐकणारी आजी...

आजी च्या बांगडी ला नेहमी सेफ्टी पीन असतेच....
आजी कडे रब्बर बॅंड, छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या असा ऐन वेळी
कुठेही ना मिळणारा ऐवज नेहमी सापडणारच...

घरी येणार्‍या प्रत्येक मित्राला डाइरेक्ट "कुठला" ही प्रश्न विचारू शकते ती फक्त आजीच....

आजी म्हटले की आठवते ते कधी ना संपाव असा वाटणारे तेल मालिश...

अप्रतिम बेसनाचे लाडू.... ज्यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही....
हळदीच्या पानात केलेले पापलेट चे तुकडे....
नाजूक सुंदर आकाराचे मोदक... ज्यांच्या कडे बघत बसावेसे वाटते....
पावसाची सर आणि आजी ने केलेली कांदा-भजी...
मी नूडल्स खाताना "आपली नात हे काय विचित्र खायला लागली" असा चेहेरा करणारी आजी...

थियेटर मधे गेल्या वर "एस्केलेटर" वर घाबरणारी आजी....

पत्त्यामधे आमच्या चीटिंग मुळे हरणारी आजी....
हळू हळू चीटिंगही करायला शिकणारी आजी....

आजी बद्दल किती लिहु आणि किती नको...
आणि काही गोष्टी लिहीण्या पेक्षा... मनाच्या कोपर्‍यात सांभाळून ठेवलेल्या बर्‍या....
लहान लहान अनुभव.... काही गुपित.... हा प्रत्येकाचा खजिना असतो....
प्रत्येक छोटी आठवण ही आयुष्याच्या घाई-गर्दी मधे येणारी
एक गार वार्याची झुळुक असते...

पण आजी म्हटले की वाटत सगळ काही सोडून द्याव..
आणि आजी च्या मांडीत डोक ठेवून झोपाव....
परत एकदा लहान ह्याव...
परत एकदा आजी सांगत असलेल्या राज कुमारी च्या गोष्टीत हरवून जाव....
आणि कधी झोप लागली ते कळूही नये.....


Wednesday, April 15, 2009

चि. सौ. का.....हिरवी गार साडी आणि ऑरेंज कलर चे जरीचे काठ....
हातात हिरव्या बांगड्या.. मधे मधे सोन्याच्या बारीक बांगड्या...
बाजूबंद...
गळ्यात 2 -3 नेकलेसस...

हातावर खूप छान रंगलेली मेहेन्दी ...
लांब केसांची सिंपल हेअरस्टाईल ..
भरपूर मोगर्याचे गजरे....
हलकासा मेक उप...
आणि डोळ्यात थोडीशी भीती...

स्नेहा आज वेगळीच खुलून आली होती...
इतकी सुन्दर ती कधीच दिसली नाही..

अंजली रूम मधे येत म्हणाली..
"ह्म्ममम ... प्यार का निखार ..."

अंजू नि दोन मिनिट तिच्या कडे बघितल ..
लग्नाच्या गडबडीत दोन क्षण शांत पणे मिळाले नव्हते...
अंजू ने स्नेहा चा हात हातात धरला....
दोघींच्या डोळ्यात पाणी दाटून आला...
अंजू पटकन सावरत म्हणाली...
"ए चल चल ... भटजी वाट बघत आहेत.."

तेवढ्यात काकी आत आल्या आणि स्नेहा ला घेऊन गेल्या...

अंजू तिकडेच उभी होती... स्तब्ध...
आठवणीत हरवून गेली..

तिला ती संध्याकाळ आठवली ...

आइस क्रीम खाउन त्या दोघी परत येत होत्या तिच्या "स्कूटी" वरुन...
कुठल्या ही गोष्टी वरुन हसण चालू होता...
अचानक "स्कूटी" ला वाटला की तिच्या कडे कुणी लक्ष देत नसावा.. म्हणून ती बंद पडली....
झाल..... उतरून किक मारण्याचे प्रयत्‍न सुरू झाले....
अंजू ने पण ट्राइ करून झाला... पण स्कूटी काही स्टारट होईना...
हे नेहमीचा होत.. स्नेहा म्हणाली "पेट्रोल खतम.. "
स्नेहा ने स्कूटी ढकलायला घेतली.. तर तीच मागे मागे यायला लागली....
हा हा हा हा.. वेड्या सारख्या दोघी हसायला लागल्या....
कारण अशी एकही ट्रिप झाली नव्हती जेंव्हा स्नेहा ची स्कूटी बंद नाही पडली...
सगळे प्रयत्‍न झाल्या वर.. फाइनली दादा ला कॉल केला....
हेलो बोलायच्या आधीच दादा म्हणाला "स्कूटी बंद पडली का??"
"ही ही ही ही...." त्यांच्या हसण्या चा आवाज़ अंजू ला आज ही ऐकू येत होता....


तेवढ्यात अंजू ला हाक मारली... "अंजू... स्मिता काकू ची साडी कुठे ठेवालिये?"
"आले आले... देते" म्हणत अंजली हॉल मधे आली..

तिने विक्रम कडे बघितले...
विक्रम सामंत!!
अंजू विचारात परत हरवली...
"हा कसा ठेवेल स्नेहा ला.. स्नेहा... साधी सरळ मुलगी...
कसा होईल तिचा लग्ना नंतर "

अंजू हसली.. स्नेहा.. आणि साधी ????
स्नेहा कसली साधी.. स्नेहा एक नंबर ची लबाड ...
पण समजूतदार...

स्नेहा सगळ्यांशी पटवून घेईल. नक्की...
पण तिला समजून घेणारा तो हाच का?
स्नेहा चे बरेच मित्रा मैत्रिणी होते.. आणि आहेत..
त्यांच्याशी तिचा असलेल्या नात्यात किती फरक पडेल आता..

लग्ना नंतर लगेच अमेरिकेला जाणार...
"परत कधी बघणर हिला मी ...." अंजू ला परत वाईट वाटू लागल ...

पिवळ्या साडी मधे स्नेहा आणखी खुलून आली होती....
स्नेहा च्या साधे पणा मुळेच कदाचित ती अधिक सुंदर दिसत होती...

स्नेहा खुश होती.. हसत होती...
अंजू ला त्या दोघींचा आवडत गाण आठवल ..
"हसती रहे ... तू हसती रहे ...."
"साथीया" ची नवीन नवीन कॅसेट आणली होती...
त्या दिवशी जवळ जवळ 50 वेळा तेच गाण रीवाइंड करून करून ऐकल होता....
शेवटी कॅसेट तुटली.. रीळ बाहेर आल.. म्हणून त्या थांबल्या...
"किती वेडे होतो आपण..." अंजू ला वाटल

मंगल-अष्टका चालू असताना अंजू ला डोळ्यातल पाणी थांबवता आला नाही...
एक एक क्षण तिला आठवत होते...

स्नेहा ने विक्रम च्या गळ्यात माळ घातली..
विक्रम ने स्नेहा च्या गळ्यात माळ घातली....

दोघांनी एक मेकांकडे बघितले...
त्या क्षणी... अंजूला त्या दोघं मधली केमिस्ट्री जाणवली...
तिला वाटला की हे एक-मेकान साठी बनले आहेत....
लग्न ठरल्या पासून इतके महिने.. अंजू ला काळजी होती...
की विक्रम योग्य आहे का??
स्नेहा शी पटेल का??

त्याचा उत्तर तिला आत्ता मिळाल होता...

स्नेहा आणि विक्रम निघताना....
स्नेहा ने अंजू ला गच्च मिठी मारली....
दोघींना काय बोलावे ते कळेना.....

अंजू ने विक्रम कडे बघितले...
विक्रम ने आश्वासक पणे डोळे मीचकवले..
अंजू हसली...

तिला आता स्नेहा ची काळजी नव्हती..
ती हळूच स्नेहा ला म्हणाली..
"ए ढमे ... तू फिरून आल्यावर "डीटेल" मधे बोलूया..."
स्नेहा हसली...


अंजू म्हणाली.. "मला विसरू नकोस हं..."

Monday, April 13, 2009

मागे वळून पहाताना...


रोज सांगतोस.... माझ्याशिवाय जगू शकत नाहीस,
माझ्याशिवाय एक ही स्वप्न बघू शकत नाहीस.


रोज सांगतोस.... तुझ्या बरोबर वेळ कसा जातो कळत नाही,
कसा तुझ्या प्रेमात पडलो? ह्याचे उत्तर काही मिळत नाही.


रोज सांगतोस..... माझ्या डोळ्यांशीवाय तुला हल्ली काहीच दिसत नाही,
आणि तुझ्या बायकोच्या जागी माझ्या-एवढी पर्फेक्ट कुणीच बसत नाही.


रोज सांगतोस... आपल नात किती वेगळे, किती छान आहे,
माझ्या एका हसणया पुढे, सगळ्या गोष्टी किती लहान आहेत.

पण...

एक दिवस सहज सांगशील, "बंधन हे तोडून जा,
माझ्यावर असलेले सगळे हक्क, आजपासून सोडून जा..."


एक दिवस सहज सांगशील, " पण मैत्री आपण तोडायची नाही.
आणि माझी साथ तू कधीच सोडायची नाहीस....."


एक दिवस सहज, स्वत:हून , तुझ्या बायकोची भेट घडवशिल ,
डोळ्यातले पाणी आवरून धरीन मी , जेंहवा हात तिचा हातात धरशिल .


त्या दिवशी मात्र, फक्त मित्र -मैत्रिणी सारखे वागू,
तू माझ्या कडून घेतलेल्या... "त्या" वचनाला जागू.


त्या दिवशी जाताना "ती" म्हणेल, "तुमची खूप छान मैत्री आहे."
तुझ्याकडे बघत मी म्हणीन "हा तुझी खूप काळजी घेईल.... ह्याची मला खात्री आहे."


त्या दिवशी सुद्धा मी वेड्यासारखी मागे वळून पाहीन,
त्या दिवशी सुद्धा मी वेड्यासारखी मागे वळून पाहीन,

तुम्हा दोघांना पाठमोरे पहाताना... जे समजायचे ते समजून जाईन!!!

Friday, April 10, 2009

तू फक्त माझा ना?

नव्या नवलाई चा गुलाबी गारवा,
दूर दूर डोळ्यांवर, थंडगार गारवा.निळेशार , क्षितिजपार, फक्त दोघांचेच आकाश,
नीसटत आहेत हे ही दिवस, नकळत, सावकाश.

हळू हळू कामाच्या व्यापात तो ही बुडून जाईल,
रात्री च्या "मिस्ड कॉल" ची ती वेळ ही खुडून जाईल.

"सारख भेटायला हवच का?" त्याचा प्रष्न काट्या सारखा टोचेल,
पण दोन दिवसांची ताटा -तूट त्यालाही, तिच्या एवढीच बोचेल.

दोघांच्या मनात हजार प्रन्शांचे काहूर,
मनसोक्त, मन मुराद भेटण्याची किती ती हुर हुर.

शेवटी एकच उत्तर आले, करायचे का लग्न?
पण हजार आहेत प्रश्‍न, आणि सतराशे साठ विघ्न.

आता एक मेकांच्या घरी, कसे, आणि काय कळवायचे?
उत्तर आणि दक्षिण दिशांना, कसे काय मिळवायचे?

आला तो दिवस, सामोरा समोर, दोन्ही संघ,
समोरच्याला गारद करण्याचा, प्रत्येकाचा चंग.

तिला कळेना, एवढे होऊन ही, तो काहीच का बोलत नाही?
तिच्या मनाची तळमळ त्याला, खरच का कळत नाही?

बोलणी फसली! प्रकरण तापले! तसा धीर हिला धरवेना,
आणि घरच्यांच्या विरुद्ध , एकही शब्द त्याला काही बोलावेना.

चार दिवस झाले तो घरी नाही आला,
100 मिस्ड कॉल्स बघून ही, त्याने फोन नाही केला.

वाटले तिला संपली सारी स्वप्ने, खोटा होता प्रेमाचा खेळ,
तेवढ्यात वाजली ओळखीच्या लयित "ती" दरावरची बेल.

सर-सर-सर-सर धावत आली, रडता रडता खुदकन हसली,
मिठीत त्याच्या शिरता शिरता, चिंता आता तिला कसली?

रूसवे, फूगवे, राग, लोभ.. लग्न -कार्यात सगळे विरले,
दोन वेड्यांच्या प्रेमा पुढे, सगळे प्रश्ना चटकन हरले.

मग एक मेकात हरवताना, पंढर्या शुभ्र बर्फात खेळताना..
तिने हळूच विचारले.. तू फक्त "माझा" ना????